Vidichi Goshta | विडीची गोष्ट
Vidichi Goshta | विडीची गोष्ट
पुस्तकांच्या जन्मकथा यावर संशोधन झाले तर खूप रंजक आणि गमतीशीर तथ्ये हाताशी येऊ शकतात. 'विडीची गोष्ट' या पुस्तकाची जन्मकथा अशीच वेगळी आहे. प्रादेशिक पातळीवर घडलेली ही गोष्ट रंजकही आहे आणि उद्बोधकही आहे. प्रत्येकाचे गाव बदलले. तसे विडीचे गावही बदलले. नव्या बदलाचे स्वागत करताना जुने सारे निःसत्व होते असे म्हणता येत नाही. इतिहासाच्या खुणा, परंपरा, सामाजिक चळवळी आणि सर्जनशील माणसे यांनी नवे गाव घडवले, यांचा एक पट या गोष्टीतून उलगडत जातो. 'विडीची गोष्ट' हे गावाचे चरित्र आहे तसेच विडीचे, विडी कारखानदारांचे आणि विडी कामगार नेत्यांचे, कामगारांचे चरित्र आहे.