Vidrohache Vyakaran - Mahatma Jyotiba Fule Yanche Nivdak Sahitya | विद्रोहाचे व्याकरण - महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य

Vidrohache Vyakaran - Mahatma Jyotiba Fule Yanche Nivdak Sahitya | विद्रोहाचे व्याकरण - महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य
जोतिबांनी निर्मिलेलं विद्रोहाचे व्याकरण "महात्मा जोतिराव फुले यांचं निवडक साहित्य डॉ. सदानंद मोरे देहूकर यांनी संपादित स्वरूपात अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह विद्रोहाचे व्याकरणया शीर्षकाने आणून मराठी पुस्तक विश्वातच फक्त नव्हे तर एकूणच भारतीय वैचारिक साहित्यात मोलाची भर घातली आहे. डॉ. मोरे म्हणतात जोतिरावांना मराठी भाषेचे व्याकरण समजत नाही असा आक्षेप घेऊन निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जोतीरावांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच्या प्रमाणभाषेच्या व्याकरणावरही त्यांनी भाषेतील कर्ता-कर्म-क्रियापदांपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारातील कर्ता-कर्म-क्रियापदांकडे लक्ष देऊन त्यात घडवून आणलेला उलथापालथ अधिक महत्त्वाची होती. उलथापालथीचं व्याकरण हे विद्रोहातुन जन्मलेलं आहे."