Vidushak |Play |विदूषक |नाटक

Vidushak |Play |विदूषक |नाटक
कलाक्षेत्रात वि. वा. शिरवाडकरांचे एक दैवत शेक्सपीयर तर दुसरे चार्ली चाप्लीन. विसाव्या शतकाच्या इतिहासात चार्ली चाप्लीनच्या ट्रॅम्प (भटक्या)चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्या ट्रॅम्पचा देशी अवतार 'विदूषक' मधील बगाराम.बगाराम ह्या मानसपुत्राचे चित्र रंगवताना शिरवाडकरांनी हास्य आणि कारुण्य यांचा सुरेख मिलाफ घडवून आणला आहे. ह्या नाटकातील विनोदी प्रवेश रंगभूमीवर अत्यंत प्रभावी ठरतात; त्याच वेळी ह्या विदूषकी ढंगाच्या गरीब बिचाऱ्या माणसाचे दु:ख अंत:करणाला जाऊन भिडते. काव्यात्मता हा शिरवाडकरांच्या नाट्यलेखनाचा एक विशेष. ही काव्यात्मता ह्या सबंध नाटकाला भारून टाकते. नाटकातील संवादांतून जीवनविषयक नवीन दृष्टिकोण देण्याची ताकद शिरवाडकरांच्या लेखणीत आहे. विदूषकमधील अनेक संवाद आपल्याला पुन:पुन्हा आठवत राहतात.