Vidyadhar Pundlik : Vyakti Ani Vadgmay | विद्याधर पुंडलीक : व्यक्ती आणि वाङ्मय

Keshav Tashi | केशव ताशी
Regular price Rs. 720.00
Sale price Rs. 720.00 Regular price Rs. 800.00
Unit price
Vidyadhar Pundlik : Vyakti Ani Vadgmay ( विद्याधर पुंडलीक : व्यक्ती आणि वाङ्मय ) by Keshav Tashi ( केशव ताशी )

Vidyadhar Pundlik : Vyakti Ani Vadgmay | विद्याधर पुंडलीक : व्यक्ती आणि वाङ्मय

About The Book
Book Details
Book Reviews

निबिड अरण्यात शिरून आपल्या पावलांच्या ठशांनी नव्या वाटा निर्माण करणारा, मोजकेच पण मौलिक लेखन करणारा लेखक ही विद्याधर पुंडलीक यांची ओळख ‘चक्र’ या एकांकिकेतील मूल्यानुभव ‘माता द्रौपदी’त संक्रमित करुन तिला मातृपद प्रदान करणारा बालमनाचे विलोल विभ्रम, ओंजळीत भरताना त्यांना प्रौढाच्या जरठ मनामनगटाने न हाताळणारा मानसशिल्पी. मृत्यू या पूर्ण विरामात शिरताना ज्याचे चिंतन श्रेय-प्रेयाच्या चिंतनाशी सलगी करतं ते प्रज्ञावंत पुंडलीक. नवकथाकारांच्या बहर पर्वात आपला स्वायत्त स्वर जपणारा आणि कथा रचनेचे बांधकाम मृगजळातलं नसतं, ते असतं एका बेलाग जलदुर्गाचं, हे साक्षांकित करणारा कथाकार. अस्तित्व पोखरणारे एकाकीपण, अस्तित्व नामशेष करणारा मृत्यू या विषयीचं डोह खोल चिंतन बोलकं करणारा बहुपिंडी आणि बहुपेडी साहित्यिक म्हणजे पुंडलीक. त्यांच्या वाङ्मयाचा काटेतोल विमर्ष डॉ. केशव ताशी यांनी घेतला आहे. गुण-दोष दिग्दर्शनही त्यांनी संयमाने आणि समीक्षेतल्या संज्ञासंकल्पनांचे जंजाळ अव्हेरून केलं आहे. डॉ. केशव ताशी यांच्या या लेखनात उद्योन्मुख समीक्षकाचा पायरव जाणवतो.

ISBN: 978-8-11-925833-8
Author Name: Keshav Tashi | केशव ताशी
Publisher: Shabdalay Prakashan | शब्दालय प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 457
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products