Vikram And Vetal @ Haibatpur | विक्रम अँण्ड वेताळ @ हैबतपूर

Vikram And Vetal @ Haibatpur | विक्रम अँण्ड वेताळ @ हैबतपूर
शेतीला काळी आई मानून जे पदरी पडेल ते निमुटपणे स्वीकारणाऱ्या भावनिक दृष्टिकोनाला छेद देत शेती प्रश्नांची मांडणी व चिकित्सा करणाऱ्या शेतकरी आंदोलनांनी बरीच घुसळण झाली. प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला आव्हान देत शेतकरी तरुण गावोगावी उभे राहिले. मतांच्या राजकारणात पुन्हा नवसरंजामदार उदयाला आले आणि या नवसरंजामदारांशी शेतकरी पुत्रांना दुसरी लढाई लढावी लागली. देवेंद्र शिरूरकर यांच्या या कादंबरीतील हैबतपुर मतदारसंघ हे केवळ एक प्रातिनिधिक कार्यक्षेत्र आहे. शेतजमिनीला 'काळी आई' मानण्यापासून ते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेपर्यंत आणि सरंजामी राजकारणापासून ते नवश्रीमंत, नवसरंजामदारांच्या उदयापर्यंत असे टप्पे या कादंबरीत आलेले आहेत. शेती व्यवस्थेतील व राजकीय क्षेत्रातील स्थित्यंतराचा ही कादंबरी वेध घेते. व्यवस्थेचा वेताळ कादंबरीचा नायक असलेल्या विक्रमच्या मानगुटीवर आहे. त्याखाली विक्रम दबून जातो की या वेताळाचे जोखड भिरकावून देतो हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.