Vimane Udwa Shubhrapankhi | विमाने उडवा शुभ्रपंखी

Vimane Udwa Shubhrapankhi | विमाने उडवा शुभ्रपंखी
माधव खरे विमानांच्या आकर्षक प्रतिकृती करायला शिकवत असतानाच विज्ञानातील, विशेषतः वायुगती शास्त्रातील असंख्य बारकावे अत्यंत सहजतेने समजावून देतात. विमानांचे उड्डाण असंख्य गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये विमानाचा पंख आणि त्याचे विमानावरील स्थान या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. म्हणूनच विमानांचे वर्गीकरणही त्याच्या पंखांच्या स्थानानुसार केले जाते. "या पुस्तकात उच्चपंखी (हाय-विंगर) मध्यपंखी (मिड-विंगर) आणि अधोपंखी (लो-विंगर) अशा तीनही प्रकारांमधील विमानांच्या एकूण नऊ प्रतिकृती दिलेल्या आहेत. या विमानांचे उड्डाण करताना पंखस्थानानुसार उड्डाणात कसा फरक पडतो याचा तुम्हाला अंदाज येईल."