Vimangatha | विमानगाथा

Vimangatha | विमानगाथा
वैमानिक होण्यासाठी लागणारे प्राथमिक शिक्षण काय असावे? प्रवेश घेतल्यानंतर काय प्रशिक्षण मिळते, वैमानिक जीवनातील मिळणारे यश व अपयश, संधी व स्पर्धा, त्यातून मिळणार्या उपाधी व व्याधी यांचे अनुभव आणि विवेचन या पुस्तकात वाचावयास मिळते.तसेच हवाई वाहतूक कंपन्या, त्यांचे व्यवस्थापन, त्यांची धोरणे यांची माहितीही येथे दिलेली आहे.विमान, विमानतळ, वैमानिक या त्रयीवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या बर्याच व्यवसायांवर राज्यशासनाचा व केंद्रशासनाचा असलेला आणि नसलेला अंकुश, तसेच त्यांचे कायदे आणि पळवाटा, या क्षेत्रात काही वर्गांनी जोपासलेली मक्तेदारी, त्यांचे हेवेदावे यांसारख्या गोष्टींवरही ‘विमानगाथा’ या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आलेला आहे.