Vinda : Vinda Karandikar Yanchi Samagra Kavita | विंदा : विंदा करंदीकर यांची समग्र कविता

Vinda : Vinda Karandikar Yanchi Samagra Kavita | विंदा : विंदा करंदीकर यांची समग्र कविता
कविवर्य विंदा करंदीकरांच्या सर्व काव्य संग्रहातून एकत्रित केलेल्या एकूण ६८२ कवितांचा हा समग्र कवितांचा संग्रह. या श्रेयस आवृत्तीमध्ये विंदांच्या सर्व कविता एकत्रित वाचायला मिळतील. मराठी कवितेचे अभ्यासक प्रा. वसंत पाटणकर यांची करंदीकरांच्या कवितांच्या गुणदोषांचे विवेचन करणारी प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण प्रस्तावना कविता समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. सुषमा पौडवाल यांनी तयार केलेली विंदांच्या साहित्याची सूचीही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. "काव्य आणि काव्य रूप या दोन्ही अंगांनी त्यांच्या कवितेचे स्थूलमानाने तीन टप्पे मानता येतील. पहिला टप्पा स्वेदगंगा आणि मृदगंध या संग्रहातील कवितेचा आहे .दुसरा मृदगंध आणि धृपद म्हणता येईल आणि तिसरा टप्पा मुख्यत्वे जातक आणि विरुपिका या संग्रहाचा आहे. त्यांची कविता या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत बदलत गेली. त्यांची बालकविता मराठी काव्य परंपरेत पूर्ण वेगळी आहे. त्यांच्या पिढीतील सर्वात प्रयोगशील कवी म्हणून त्यांच्याकडे पाहता येते. त्यांची कविता जीवनाला मनःपूर्वकतेने सामोरी जाताना दिसते. कवितेच्या कलात्मक आकृतीचे मोल तिच्या आशयाच्या संपन्नतेवर सखोलतेवर जीवनाचे दर्शन घडवण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते...त्याच्याशी एकरूप असते. करंदीकरांची कविता वाचत असताना त्यांचे हे सामर्थ्य सतत जाणवत राहते."