Vithaichi Kanhai | विठाईची कान्हाई

Aarti Kale | आरती काळे
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Vithaichi Kanhai ( विठाईची कान्हाई ) by Aarti Kale ( आरती काळे )

Vithaichi Kanhai | विठाईची कान्हाई

About The Book
Book Details
Book Reviews

सौ. आरती काळे यांची ‘विठाईची कान्हाई’ ही संत कान्होपात्रा यांच्या जीवनावरची कादंबरी आहे. संत कान्होपात्रा ही वारकरी संतांमधील सोनचाफ्याचे फूल आहे. ती शामा गणिकेची मुलगी असून अत्यंत सौंदर्यवती, नृत्यनिपुण व मधुर आवाज असणारी होती. तिच्या सौंदर्याची, नृत्याची, आवाजाची ख्याती दूरवर पसरली होती; पण ती मात्र विठ्ठलभक्तीत तल्लीन होती. पांडुरंगाशी तिची एकनिष्ठता, भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, बिदरचा राजा तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला पकडून आणण्यासाठी सरदार पाठवतो; पण ती शेवटचे दर्शन घ्यायला विठ्ठल मंदिरात जाते व आपला देह विठ्ठलचरणी समर्पित करते. मृत्यूलासुद्धा आपल्या इच्छेने, भक्तीने अधीन करून घेणारी कान्होपात्रा एक श्रेष्ठ भक्त आहे. "सौ. आरती काळे यांच्या ‘विठाईची कान्हाई’ या कादंबरीत कान्होपात्रेच्या आयुष्यातील उत्कट भक्तीचा विरक्तीचा प्रत्यय येतो. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील संघर्ष गणिकेचे जीवन तत्कालीन समाज व संस्कृती यांचे दर्शन घडते. कान्होपात्रा गणिका व सुंदर असल्याने तिच्या वाट्याला येणारे दुख एक स्त्री म्हणून तिच्या वेदना यातना आपल्याला जाणवतात; पण तिची भक्ती एकनिष्ठता पाहून मन विस्मित होते तिचा हा उत्कट प्रवास लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत अर्थपूर्ण संवादात व रसाळ भाषेत फार भावपूर्णरीत्या रेखाटला आहे."

ISBN: 978-9-39-548100-7
Author Name: Aarti Kale | आरती काळे
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 172
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products