Vyasancha Varasa | व्यासांचा वारसा

Vyasancha Varasa | व्यासांचा वारसा
महाभारतात प्रक्षेपांच्या स्वरूपात टाकली गेलेली भर वेगळी करून दाखवणे आणि व्यासांचा खरा वारसा अधोरेखित करणे अशा दुहेरी हेतूने हे लेखन झाले आहे. महाभारतातील पात्रांना आदर्श, परंपरा, सुष्टदुष्टत्वाच्या रूढ चौकटी आणि सांस्कृतिक संदर्भ इत्यादी जोखडांतून मुक्त करून निखळ माणूसपणाच्या परिप्रेक्ष्यात ठेवताना महाभारताकडे पाहण्याचा एक नावाच दृष्टिकोन जातेगांवकर वाचकांना देतात. कोणत्याच एका पात्रात ते गुंतून पडत नाहीत, कित्येक पात्र जसे दिसले जाणवले तसे मांडत जातात. त्याचवेळी ठिकठिकाणी व्यासांनी आपल्यासाठी सोडलेल्या कोर्या जागांचा तसेच विशिष्ट प्रसंगीच्या सर्व शक्यतांचा पडताळा घेत घेत ते महाभारताचे मर्मही शोधत असतात.