Wagh Sinh Maze Sakhe - Sobati | वाघ सिंह माझे सखे - सोबती

Wagh Sinh Maze Sakhe - Sobati | वाघ सिंह माझे सखे - सोबती
दामू धोत्रे कित्येक वर्षे 'रिंगलिंग ब्रदर्स अॅंड बार्नुम बेली' सर्कशीत जनावरांची कामे घेत असत आणि या अवधीत रिंगणातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम टाळ्यांच्या गजरातच पार पडत असे. गुरगुराट करणार्या हिंस्त्र बिबळ्यांनी भरलेल्या रिंगणात शिरून दामू जेव्हा बेडरपणे त्यांना हुकूम फर्मावित, तेव्हा त्यांचा तो डौल आणि आवेश नुसता पाहात राहावासा वाटे. जनावरांवरील दामूंची हुकूमत, ही केवळ त्यांचा कमालीचा निधडेपणा, असीम संयम आणि जनावरांचे मनोगत जाणून घेण्याची हातोटी यामुळेच त्यांना साध्य झालेली होती. त्यांच्या शिकवण्यात धाक किंरा शिक्षा यांना थारा नसून जनावरांना आपलेसे करण्याची-प्रेम आणि सहानुभूती हीच त्यांची मुख्य साधने होती. अशा या साहसी, बेडर सकर्स आणि त्यातील प्राणी यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा आढावा. या ग्रंथाचे भानू शिरधनकर यांनी शब्दांकन केले आहे.