Wangmayin Sanskruti Va Samajik Vastav | वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव

Wangmayin Sanskruti Va Samajik Vastav | वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा मोठा पट अवलोकनासाठी सारंग यांनी यात हाताशी घेतला आहे. सन १८८० पासून ते २००५ पर्यंतचा हा मोठा कालखंड. तो तीन भागांत विभागण्यात आला आहे. त्या त्या काळातील संस्कृती, त्या त्या काळातील वास्तव व त्या त्या काळातील मराठी लेखक-कवी या घटकांना कशा प्रकारे सामोरे गेले ही या विभागणीमागची मूलसूत्रे. पुस्तकाचा मोठा भाग व्यापणारा हा इतिहास कथन करताना सारंग मराठी साहित्यातील अनेक उणीवांना (काही घडलेल्या, काही आजही ठळकपणे जाणवणार्या) हात घालतात. व्यक्तिवादाचा अभाव, व्यक्तिगत विदोहाचा क्षीण आवाज, वास्तवाचे न पडणारे प्रतिबिंब ... अशा कितीतरी, या उणीवा दाखवून सारंग त्याची दोन पातळ्यांवर कारणमीमांसा करतात. पहिली सामाजिक, जातीय, वर्गीय , वणीर्य स्थितीच्या अनुरोधाने येणारी. ही पातळी अगदी ढळढळीतपणे समोर येणारी आणि त्यामुळेच उमजण्यास सोपी.