Yakshaprashna | यक्षप्रश्न

Yakshaprashna | यक्षप्रश्न
महाभारत हा असा ग्रंथ आहे, की कितीही विवेचन केलं तरी आणखी काही प्रश्न उरतातच. डॉ. शांता नाईक यांनीही या ग्रंथाकडं स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहून काही प्रश्न विचारले आहेत, चर्चा केली आहे. शकुंतला, रेणुका, अंबा, अंबिका, अंबालिका, दमयंती, देवयानी, गांधारी, कुंती अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यांतल्या घटनांचा डॉ. नाईक यांनी परामर्श घेतला आहे. या स्त्रियांच्या कथांतून वात्सल्य, मातृत्व, कोमलता अशा गुणाचं उदात्तीकरण करून स्त्रियांना शिक्षणापासून आणि समाजाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं, असा एक दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे. या स्त्रियांच्या मनात एक व्यक्ती म्हणून स्वत:च्या अधिकारांचा, स्वातंत्र्याचा विचार आलाच नसेल का, अशा दृष्टिकोनांतून त्यांनी या स्त्रियांच्या कथांची मांडणी केली आहे.