Yayati Ani Devyani |ययाती आणि देवयानी

Yayati Ani Devyani |ययाती आणि देवयानी
संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक संगीत रंगभूमीवरील महत्वाचे नाटक आहे. कच देवयानीची कथा खाडिलकर यांच्या सं. विद्याहरण नाटकात झाली आहे. त्यापुढील कथा भाग या रंगविला आहे. आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे वागत असलेल्या ययाती, देवयानी, शर्मिला, कचदेव यांच्यामधील वैचारिक संघर्ष या नाटकात प्रभावीपणे रंगवला आहे.पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरसाजाने नटलेली तम निशेचा सरला, तिमिरातुनी तेजाकडे, तुझ्या यशाचा हा पुनवचांद, प्रेम वरदान स्मर सदा, मी मानापमाना नच मानतो, यतिमन मम मानित त्या, सर्वात्मका सर्वेश्वरा, स्वर्ग मला सुभग आज, हे दीपा तू जळत रहा, हे सुरांनो चंद्र व्हा. अशी अनेक लोकप्रिय पदे या नाटकात आहेत. मराठी भाषेच सौंदर्य आणि अभिजात नाटयसंगीताची जादू या नाट्यप्रयोगात अनुभवायला मिळते.