Ye Hai Mumbai Meri Jaan ! | ये है मुंबई मेरी जान !

Ye Hai Mumbai Meri Jaan ! | ये है मुंबई मेरी जान !
सरदार कुलवानसिंग कोहली - यांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन राजकीय क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी त्याचा घनिष्ट संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार-राजेंद्रकुमार-धमेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार-जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी- मधुबाला या नायिका,व्ही. शांताराम-असिफ -मेहबूब सारखे दिग्दर्शक, नौशाद सारखे अनेक संगीतकार,प्राण सारखे खलनायक अशा अनेक दिग्गज कलावंतांसोबत त्यांच्या तारा जुळल्या. हि सारी माणसं अन त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ या पुस्तकामधून लेखकानी जिवंत केला आहे!