Yogguru B. K. S Iyengar | योगगुरु बी. के. एस अय्यंगार

Yogguru B. K. S Iyengar | योगगुरु बी. के. एस अय्यंगार
बी.के.एस. अय्यंगार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू म्हणून ज्ञात आहेत. भारताबरोबरच जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. घरची अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःची नाजूक प्रकृती अशी पाश्र्वभूमी असताना त्यावर निग्रहाने मात करत ते योगविद्येत निपुण झाले. "या वैशिष्ट्यपूर्ण अशा चरित्रात एकूण सहा विभाग आहेत. पुस्तकाच्या पहिल्या विभागात गुरुजीच्याच शब्दांत त्यांचा बालपणापासून ते योगगुरू होण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे व्यक्त झाला आहे. यानंतरच्या विभागात गुरुजीची मार्गदर्शनपर भाषणे व मौलिक विचार वाचायला मिळतात तर पुढील विभागात ज्येष्ठ योगसाधकांनी गुरुजीच्या घेतलेल्या मुलाखती व शिष्यांनी केलेले त्यांचे मूल्यमापनात्मक वर्णन हे सर्व अतिशय प्रेरणादायी व जीवनाविषयी नवा दृष्टिकोन देणारे आहे. शेवटच्या भागात प्रशांत अय्यंगार गुरुजींनी व जयराज साळगावकरांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून गुरुजीच्या व्यक्तिमत्यताले अनोखे पैलू उजेडात येत्तात."