Your Prime Minister Is Dead | युवर प्राइम मिनिस्टर इज डेड

Your Prime Minister Is Dead | युवर प्राइम मिनिस्टर इज डेड
भारताच्या राजकीय इतिहासातील चिरकाल टिकलेल्या एका रहस्यावर हे पुस्तक आधारित आहे.भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या रहस्याबाबत लेखकाने घेतलेल्या शोधाचा हा मराठी अनुवाद आहे.अनुज धर यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्युविषयीच्या अधिकृत निवेदनाला छेद देणारी आणि तितकीच अस्वस्थ करणारी दुसरी बाजू प्रस्तुत पुस्तकात मांडली आहे.लालबहादूर शास्त्री यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, की अन्य काही कारणांमुळे झाला?, ताश्कंदमध्ये त्या वेळी नेमके काय घडले?, नेताजी आणि शास्त्री यांची भेट झाली होती का? यांसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींवर या पुस्तकात ऊहापोह करण्यात आला आहे.वाचकाला अंतर्मुख करणार्या भाषाशैलीतले अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या पुस्तकातून वाचकांसमोर येते.