Zadazadati | झाडाझडती

Zadazadati | झाडाझडती
आधुनिक भारतातल्या छोट्याछोट्या महाभारतांच्या चित्रणासाठी प्रसिद्ध अशा ज्या काही समकालीन भारतीय कादंबर्या आहेत, त्यांतील मराठीत प्रथमच लिहिली गेलेली ही एक महत्वाची कादंबरी आहे. काळाचा विशाल पट येथे नाही, एक धरण होणे हीच एकमेव मोठी घटना येथे आहे. परंतु या घटनेच्या अवतीभोवती असलेल्या विविध क्रियाप्रतिक्रियांचं चित्रण या कादंबरीत झालेलं आहे. दहा-पंधरा बर्षांच्या काळातील, प्रदेशातील आणि मानवी जीवनातील बदल येथे टिपलेले आहेत, त्यातून कादंबरीतील अवकाशाची विशालता आपल्याला जाणवते. धरण हे या कादंबरीत राजकीय नियतीचं उग्र भयंकर रूप ठरतं. या राजकीय नियतीच्या अमर्याद ताकतीमुळे सामान्यांना झाडाझडती द्यावी लागते. अतिशय स्फोटक राजकीय आशय असलेली ही कादंबरी आहे.