Zebunnisa | झेबुन्निसा

Zebunnisa | झेबुन्निसा
एक बंडखोर शहजादी... झेबुन्निसा. हा अंशतः इतिहास तर काही प्रमाणात काल्पनिक कहाणी आहे. त्याची नायिका आहे एक मुस्लीम शहजादी औरंगजेबाची लाडकी मुलगी झेबुन्निसा. तिच्या नजरेतून १७ व्या शतकातील भारत पाहताना डोळे पाणावतात, हृदय भारावून जाते. ही झेबुन्निसाची आणि मखफीची गोष्ट आहे. काळाच्या ओघात या दोघीही नष्ट झाल्या असल्या तरी भारताच्या सर्वात काळ्याकुट्ट कालखंडा पैकी एक असलेल्या काळातील त्यांनी वठवलेल्या भूमिकेमुळे त्यांना इतिहासात त्यांचे योग्य स्थान द्यावेच लागेल. या पडद्यामागच्या आणि फारशा कुणाला माहीत नसलेल्या लक्षात राहतील अशा व्यक्तिरेखांनी आणि रोमांचक घटनांनी परिपूर्ण अशी ही कहाणी आहे.