Zen And The Art Of Motorcycle Maintenance | झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स

Zen And The Art Of Motorcycle Maintenance | झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स
मोटरसायकलवरून केलेल्या प्रवासाची ही गोष्ट. नव्हे, मोटरसायकलची गोष्ट मोटरसायकल साधी नाही, मानवी जीवनातले पेच आणि आव्हानं यांचं प्रतीक. तिच्या देखभालीत दडली आहेत त्यांची उत्तरं. मोटरसायकल सुरळीत चालणं म्हणजे दर्जेदार नैतिक जीवन जगणं. म्हणजे मोटरसायकलची देखभाल हे एक तत्त्वज्ञानच. प्रवासात निवेदकाबरोबर आहेत त्याचा मुलगा आणि मित्र-जोडपं. नवा भवताल, नवा निसर्ग, नवनवे मुक्काम. पण मुक्कामाला पोहोचणं महत्त्वाचं नाही.महत्त्वाचं आहे ‘जात राहाणं’. जाताजाता सहप्रवाशांबरोबर होणारे संवाद-विसंवाद चिंतनाला गती देतात. प्रवास, सहप्रवासी, चिंतन, मोटरसायकलची देखभाल यात फिरणारं निवेदन आकर्षक आहे. ही कादंबरी जगभर लोकप्रिय झाली. तिच्या आकृत्त्या निघाल्या, अनुवाद झाले. मराठीच्या पसार्यातही हिला जागा हवीच. या ‘प्रवासा’ची मोहिनी वाचकावरही पडेल.