Zubeda | झुबेदा

Zubeda | झुबेदा
राधाने तिला मंदिराच्या दारी आणलं. दाराला- खिडकीला असतात तशा सळया होत्या. दोन सळयांच्या अंतरातून मूर्ती स्पष्ट दिसत होती. मोरेची श्वेत वस्त्रातली, एकतारी हातात घेतलेली. शुभ्र, सोज्वळ मूर्ती बघून झुवेदा स्तंभित झाली, नुकत्याच प्रज्वलित केलेल्या समईची मंद ज्योत, तिचा हलकासा प्रकाश मीरेच्या चेहऱ्यावर प्रकाशत होता. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता. तिच्या चरणी वाहिलेली ताजी फुलं जणू हसत होती, त्यांच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखी. झुबेदा बघतच राहिली, हरवून गेली. नकळत तिने सलाम केला. राधा क्षणभर चकित झाली, आणि मग मनाशीच हसली. सलाम काय आणि नमस्कार काय? नत होणं महत्वाचं