Zuluk American Toryachi | झुळूक अमेरिकन तोऱ्याची

Zuluk American Toryachi | झुळूक अमेरिकन तोऱ्याची
अमेरिकेला जाणार्याची संख्या फुगते आहे. जाणारे अधिक, परत येणारे कमी. परत न येण्याच्या उद्देशाने दोर कापून गेलेला सुपुत्र झटक्यात अमेरिकन संस्कृती आत्मसात करतो. पण आश्र्चर्य म्हणजे, चारसहा महिन्यांच्या बोलीवर गेलेले त्याचे आईवडील, सासुसासरे, काके-मामे सुरुवातीला अवघडले तरी माघारी येताना मात्र अमेरिकन जीवनशैलीतल्या ठळक हिर्यामोत्यांचा अंगीकार करूनच आलेले दिसतात. एवढंच काय, पण पॅकेज्ड टूरतर्फे चौदा रात्री अमेरिकन मॉटेल्समध्ये, चार विमानात आणि सहा बसमध्ये साजर्या करून आलेल्या अन्कनेक्टेड देशबंधुभगिनींच्याही वागण्याबोलण्याला अमेरिकन कल्हई लागलेली दिसते. ... अशा या `अमेरिकन तोर्या'ची लेखकाने घेतलेली मासलेवाईक झाडाझडती वाचकांवर प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारी आहे.