Zunj | झुंज

Zunj | झुंज
भारतीय नेपोलियन असं ज्याचं वर्णन करावं असा यशवंतराव होळकर ही मराठी इतिहासानं राष्ट्राला दिलेली देणगी आहे. हातांचा उपयोग परक्या धन्यांच्या समोर मुजरे करण्यासाठी ज्या काळांत लोक करीत होते त्या काळात समर्थपणे समशेर पेलून तिच्या टोकानं इंग्रजांना आव्हान देणारा यशवंत राणाजी हजारो अश्वदळाचा सेनापती. समशेरीप्रमाणच मुत्सद्देगिरीची ही तलवार चालवणारा राजकारणी. पण त्याच्या उरी एक शल्य होतं. स्वामिनिष्ठेचा एक पारंपारिक पगडा असलेल्या त्या दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात हा माणूस पेशव्यांनी आपल्याला माळव्याची सुभेदारी अधिकृतपणे द्यावी, त्यांच्या हातून मानाची वस्त्रं मिळावीत म्हणून धन्याच्या पायाशी धरणं धरून बसला. पण त्याला मिळाली उपेक्षा, अवहेलना आणि अपमान. एक उमदं जीवनपुष्प चुरगळलं गेलं.श्रृंगार आणि वीररसानं ओलीचिंब झालेली यशवंतराव होळकराची शोकांतिका म्हणजेच 'झुंज'.